Summary of the Book
अनियमित दिनचर्या अर्थात शिफ्ट ड्यूटी आणि ताणतणाव या विषयाबाबत जेव्हा संजयशी चर्चा सुरू होती तेव्हा मनात विचारा आला की, एकविसाव्या `इन्स्टंट’ शतकाचा मंत्र आहे- प्रगती, अधिक प्रगती आणि फास्ट प्रगती! या जीवघेण्या धावपळीच्या युगात आपण सतत मनाने आणि शरीराने बेछूट धावत आहोत. शरीराने आणि मनाने आपल्याला विश्रांती घेण्यासाठी कितीही आर्जवं केली, तरी ती ऐकण्याएवढी फुरसत आपल्याकडे नाही. असंच जर धावत राहिलो तर एक दिवस शरीररूपी घड्याळाचे काटेच निखळतील, आता वेळ आली आहे, क्षणभर का होईना, स्वतःसाठी थांबण्याची! अशा धावपळीतही शरीररूपी घड्याळ लयीत चालावं या विषयीचं मार्गदर्शन करणार्या या पुस्तकासाठी नाव सुचलं-स्टॉप वॉच! `स्टॉप वॉच’च्या निमित्ताने आपणा सर्वांच्या जीवनात नियमितता येवो आणि संजय व स्नेहल यांच्या समाजस्वास्थ्य नीट करण्याच्या प्रयत्नांना यश येवो, हीच सदिच्छा!
भरत दाभोळकर