अणु विज्ञानातील झंझावात
Available Immediately

 
Hard Copy Price: 25% OFF
R 125 R 94 / $ 1.21
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
Shipping charges will be applicable for this book.
For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
आजही काकोडकर म्हणजेच अभ्यास, संशोधन असं सूत्र अनुभवता येतं. स्वतः वरील सार्थ व ठाम विश्वास त्यांना विश्वापुढेही ताठ मनाने उभा करतो. विरोधाला न घाबरता आपल्या कार्मावरील निष्ठेने ते पुढे पुढेच जात राहतात. देशभक्ती तर त्यांच्या नसानसांत सळसळते अन् स्वाभिमानाच्या किनाऱ्याने धीरगंभीर ज्ञानसागर अजूनच खुलून दिसतो. आपल्या कार्यकर्तृत्वाने आंतरराष्ट्रीय स्तरावर ठसा उमटवणाऱ्या डॉ. अनिल काकोडकरांकडे अणुशक्ती आणि कार्यभक्ती दिसून येते. आपलं 'अनिल ' हे नाव सार्थ करत ते अनुविज्ञानातील झंझावात ठरतात, ज्यात भारताची वैज्ञानिक शक्ती पुरेपूर भरलेली आहे. एकीकडे ज्ञानाचा हा झंझावात मनाच्या गाभाऱ्यात मात्र शांतसौम्य स्वभावाच्या नंदादीपाच्या रूपात सतत तेवत असतो. डॉ. काकोडकरांचा प्रवास हा साधाराणतेकडून असधारणतेकडून आणि पुन्हा साधारण होतो, म्हणूनच सामान्यातल्या सामन्याला देखील हा वैद्यानिक सोपा आणि कळण्यासारखा होतो, त्यामुळे आपसुकच हृदयात जाऊन विराजमान होतो.
       त्यांच्या प्रचंड कार्याच्या अनुरुपाएवढे जरी कार्य आपण करू शकलो तरी भारतभूमीचे पांग फिटू शकतील. महान कार्यकर्तृत्व असणाऱ्या या वैज्ञानिकाच्या मनात अनुप्रवेश केला की तिथलं जग विराट वाटतं अन् या विराटदर्शनाने दिव्यत्वाची प्रचीती येते. त्यांच्या मनाच्या गाभाऱ्यात सतत तेवणाऱ्या नंदादीपाला सतत क्रियाशील असलेलं चित्त हे जणु स्नेह पुरवतं अन् विवेकाच्या वातीने सदैव प्रज्वलित बुद्धीची समई लखलखते. हा गाभाऱ्यात पवित्र मंद प्रकाश सतत तेवत राहतो आणि बाहेर त्याची गाथा पसरत जाते. बाहेरील यशाने त्यांचा मन गाभारा उजळतो खरा. पण झळाळतो तो अंतर्गत तेजानेच. या गाभाऱ्यातला सुवास युगायुगाने दरवळत राहील... भारतातही अन् भारताबाहेरील !
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/5000
* Verfication Code:
 

Share This Link
RECENTLY VIEWED
Login
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address

Type the characters you see in the image below. Letters shown are not case-sensitive.
   
Whatsapp Live Chat