Summary of the Book
‘जंगल’ आणि ‘कातण’ या दोन यशस्वी कादंबर्यांनंतरची प्रा. व. बा. बोधे यांची ‘वाघीण’ ही तिसरी कादंबरी! कानफाटी गोसावी ही तशी उपेक्षित जमात! निव्वळ पोटासाठी लाचारीने जगणारी. खाली मान घालून वाट चालणारी! बेदरकारपणे जगणार्या सवर्णांनी जेव्हा हा समाज पायदळी तुडवला तेव्हा वाघिणीसारखी चवताळून उठली ती रत्ना! आगीचा लोळ फरारत जावा तसे तेजस्वी जीवन जगणारी ही स्त्री साक्षात मृत्यूला आव्हान देते. वाघिणीने सावज तोंडात झेलावं तसा मृत्यू अंगावर झेलते. पोलीस खात्याची झोप उडवते. अस्सल ग्रामीण बोलीभाषेत अवतरलेली, वाचकांना विलक्षण अस्वस्थ करून सोडणारी ही कादंबरी मराठी प्रादेशिक कादंबरीच्या छापील वर्तुळाला छेद देणारी आहे.