Summary of the Book
प्रख्यात रंगकर्मी प्रभाकर पणशीकर यांचे नाव नाटकवेड्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलेले आहे. 'तो मी नव्हेच,' 'इथे ओशाळला मृत्यू ' 'जिथे गवतास भाले फुटतात, ' 'बेईमान, ' अशी एकापेक्षा एक सरस नाटके त्यांनी रसिकांसमोर सादर केली.
पणशीकरांचे हे नाटकाच्या व्यासपीठावरचे आयुष्य आणि वैयक्तिक आयुष्याचा पट त्यांनी स्वत:च या पुस्तकात शब्दबद्ध केला आहे. या काळातील त्यांच्या आठवणी, त्यांनी केलेल्या भूमिकांमागची कहाणी त्यांनी सांगितली आहे.
शिवाय त्यांना भेटलेली माणसे, अनेक घटना, प्रसंग त्यांनी वाचकांसमोर ठेवले आहेत. पणशीकरांच्या नाटकांतील छायाचित्रांचाही समावेश पुस्तकात आहे.