Summary of the Book
कोकणातल्या एका गावाकडच्या माणसाची सही थेट भारत सरकारच्या नोटेवर .......! असामान्य कर्तुत्व , जिद्द आणि अफाट बुद्धिमत्ता असलेल्या या उत्तुंग व्यक्तीमत्वाचा भारत सरकारने १९७५ साली पद्मविभूषण सन्मानाने उचित गौरव केला. या थक्क करणाऱ्या जीवनप्रवासाचा घेतलेला हा वेध.
डॉ. श्रीनिवास वेदकलिखित या पुस्तकात एकूण चोवीस प्रकरणे असून, देशमुख घराण्याचा इतिहास, सी.डीं.चे मुंबईतील शिक्षण, त्यांचे केंब्रिजमधील शिक्षण, सनदी नोकरीत भूषविलेली उच्च पदे, रिझर्व्ह बॅंकेच्या गर्व्हनर पदावरील विराजमानता, नियोजन मंडळाची निर्मिती, वित्तमंत्रिपदाचा कालावधी, मुंबईसह महाराष्ट्राची चळवळ व मुंबईसाठी त्यांनी दिलेला राजीनामा वगैरे सी.डीं.च्या जीवनावरील महत्त्वाच्या घटनांचा परामर्श या पुस्तकामधून घेण्यात आला आहे.
हे पुस्तक वाचनीय असून, सी.डीं.च्या अनेक पैलूंचे विलोभनीयदर्शन त्यातून होते. त्यांचे बालपण, शिक्षण, कर्तृत्व, संघर्ष, कौटुंबिक जीवन या सर्वांवरच लेखकाने प्रकाश टाकला आहे. त्यातील बारकावे टिपले आहेत. सी.डीं.ची अचाट बुद्धिमत्ता, स्मरणशक्ती, सद्भावना आणि देशभक्ती या सर्व गोष्टी पुस्तकामध्ये जागोजागी प्रत्ययांस येतात.