Hard Copy Price:
R 100
/ $
1.28
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
तरंग मनाचे हा कविता संग्रह अगदी सहज, सोप्या आणि साध्या (बोली) भाषेतला. तरीही भावभावनांचा वेध अचूक पणे घेण्यास यशस्वी ठरतो. मनातील भाव तरंग शब्दबद्ध करण्यात हा कविता संग्रह यशस्वी ठरला आहे. समाजातील घडत असणाऱ्या घटनांच अचूक वर्णन यात आहे. आपल्याकडून अशीच साहित्य सेवा घडावी यासाठी शुभेछ्या.
विकास जोशी, सातारा.
Gayatri Oak
30 May 2014 12 39 PM
नमस्कार, तुमचा कवितासंग्रह काल मिळाला. ह्या कवितासंग्रहातील कविता मला प्रतिबिंब पेक्षा जास्त आवडल्या. खास करून, 'हातावर हात टेकले", "दमलीत सारी दु:खे", "मनात खोलवर रुजतेय काही", "तुझा आणि माझा सूर्य", "ताल" ह्या कविता जास्त आवडल्या. "काळजावरील घाव" पण छानच आहे. पण ह्या कवितेच्या शेवटाबद्दल एक वाटलं, आपण अश्व्स्थाम्याइतके अभागी नसतोच. त्या बिचाऱ्याला तर त्याच्या जखमेतून ना कधी सुटका मिळणार, ना त्याला त्याची वेदना कधी विसरता येणार! आपल्यालाही घाव मिळतात, पण सुदैवाने ते घाव विसरायला लावणाऱ्या चांगल्या घटना घडत राहतात. म्हणूनच आपण अश्वशाम्यापेक्षा नक्कीच भाग्यवान असतो, असे मला वाटत. हा कवितासंग्रह खूपच छान आहे. यापुढील आशाच छान लिखाणासाठी all the best !.
गायत्री ओक, डोंबिवली