Summary of the Book
प्रत्येक व्यक्तीच्या मनात काही सुप्त इच्छा असतात. प्रत्येकाची काही स्वप्न असतात. जेंव्हा या सुप्त इच्छा, स्वप्न जेंव्हा स्पष्टपणे त्या व्यक्तीला समजतात, तेव्हा ते त्या व्यक्तीला समजतात, तेव्हा ते त्या व्यक्तीचे ध्येय होते. प्रत्येकाचे ध्येय वेगळे असते. ध्येयापर्यंत पोहोचण्याचे मार्ग, श्रम करण्याची तयारी, ध्येयापर्यंत पोहचण्याची वेळ यत फरक असु शकतो. पण ध्येयपुर्तीकडे जाण्यासाठीच्या मार्गात काही गोष्टी समान असतात. तीव्र मनोबल, चिकाटी, सराव, सचोटी या गोष्टींनी ध्येयापर्यंत पोहचण्यास मदत होते.
लेखकाने नेमक्या याच गोष्टी वाचकांना सोप्या भाषेत स्पष्ट करून सांगितल्या आहेत. पुस्तकाच्या लेखकाला पोलीस दलातील कामाचा प्रदीर्घ अनुभव आहे. त्यामुळे या पुस्तकाला वास्तवदर्शी अनुभवांचे प्रमाण आहे. त्याचे प्रत्यंतर पुस्तकात दिसते. या पुस्तकाद्वारे प्रत्येकाला उत्तम समुपदेशन मिळू शकते.