Summary of the Book
महाराष्ट्रातील `अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनां’ना सव्वाशे वर्षांची दीर्घ परंपरा आहे.
कवी, लेखक, विचारवंत, संस्थानिक, इतिहाससंशोधक, समाजशास्त्रज्ञ, भाषावैज्ञानिक, राजकीय नेते आदींनी संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले आहे.
अध्यक्षीय भाषणांना महाराष्ट्रातील ऐतिहासिक, भौगोलिक, धार्मिक आणि सांस्कृतिक पार्श्र्वभूमी लाभल्यामुळे ही भाषणे हा एक मौलिक दस्तावेज ठरतो.
मराठी भाषा आणि साहित्याची वाटचाल, महाराष्ट्राची प्रादेशिक अस्मिता, मराठी भाषेचे अस्तित्व आणि भवितव्य, कलावंतांची साहित्यनिर्मिती व त्यांचे स्वातंत्र्य, नवे-जुने वाङ्मयीन प्रवाह आणि वाद इत्यादींची चर्चा संमेलनाच्या व्यासपीठावरून होत राहिली.
प्रा. वि. शं. चौघुले यांनी संपादित केलेल्या `अध्यक्षीय भाषणांतील साहित्यविचार’ ह्या संपादित पुस्तकात साहित्य संमेलनांतील साहित्यचर्चेचे विहंगम दर्शन घडते.
याशिवाय संमेलनाचे अध्यक्ष, संमेलनस्थळ व काळ यांचा निर्देश आणि संमेलनविषयक संदर्भग्रंथांची अद्ययावत सूची पुस्तकात आहे. म्हणूनच साहित्यप्रेमी रसिकांना आणि मराठीच्या साक्षेपी अभ्यासकांना हे संपादन उपयुक्त ठरणारे आहे.