Summary of the Book
प्रस्तुत लेखसंग्रहात कवितेचं आकलन कसं करून घ्यावं, म्हणजे कविता कशी समजून घ्यावी याची साहित्यिक वा सैद्धान्तिक चर्चा केली आहे. कवितेबाबत साधारणपणे जे जे आक्षेप घेतले जातात किंवा जी जी विधानं केली जातात, त्याचं स्पष्टीकरण, विवेचन आणि विश्लेषण करण्याचा प्रयत्न या पुस्तकामध्ये केला आहे. वसंत पाटणकर हे प्राध्यापक असल्याने आणि हे पुस्तक साहित्य समीक्षा या वर्गवारीतले असल्याने ‘कवितेचा शोध’ घेण्याचा प्रयत्न अॅकॅडमिक पातळीवरूनच केला आहे.