Summary of the Book
मातंग, ढोर, सिक्यागार, छप्परबंद, राजगौड’ अश्या अठराच काय त्याहून अधिक प्रकारच्या जातीजमाती आपल्या समाजात सुखनैव नांदत आहेत. त्यातील कित्येकांची नावेही आपल्याला अपरिचित आहेत तर मग ते राहतात कसे व मुख्यत: कोठे, त्यांच्या रीतीभाती काय, वगैरे वगैरे तर आपल्याला माहिती असणे तर संभवनीयच नाही म्हणूनच लेखकाने जाणीवपूर्वक वाचून-हिंडून-बोलून ही माहिती जमा केली आहे व ह्या पुस्तकाद्वारे सुलभतेने वाचकांपुढे ठेवली आहे. मागासलेल्या, भटक्या अशा ह्या समाजातील खूपशा गोष्टी खटकणार्या असल्या तरी काही बाबतीत त्या सुशिक्षितांनाही मागे टाकणार्या विचार करायला लावणार्या आहेत हे विशेष !