Summary of the Book
नीहारा प्रकाशनातर्फे प्रकाशित होणारा 'स्वप्नझुला' हा प्रतिमा कुलकर्णी यांचा पहिलाच काव्यसंग्रह असून ऋजू, उत्कट शब्दकळा आणि काव्यविषयातील विविधता हि त्यांच्या कवितेची वैशिष्ट्ये सांगता येतील. त्यांच्या बहुतेक सर्वच कवितांमधील तरलता आणि भावव्याकूळता वाचकांच्या मनाला स्पर्श करते. कवयित्रीने स्त्रीवादाची किंवा कोणतेही 'पोझ' घेऊन लेखन केलेले नाही हे विशेष. प्रेम, निसर्ग, काव्यलेखन, मानवी जीवनविषयक चिंतन अशा विविध अशा विषयांवरील ३९ कवितांचा समावेश या संग्रहात असून कवयित्रींच्या सकारात्मक, निर्मल, निसर्गप्रेमी मनाचे प्रतिबिंब या कवितांमध्ये मोहक स्वरूपात प्रतिबिंबित झालेले दिसते.
काव्य रसिकांची मनमोकळी दाद या कवितांना नक्की मिळेल.