Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available
Preview
Summary of the Book
संपूर्ण देश समस्याग्रस्त आहे. आणि महाराष्ट्रात तर सर्वाधिक समस्या आहेत. साहजिकच महाराष्ट्रात लहानसहान सामाजिक चळवळींचं जाळंही मोठं आहे. पण समाज परिवर्तनातलं त्यांचं योगदान लहानसहान म्हणता येणार नाही. जाहिरातबाजी, गवगवा, गाजावाजा किंवा आजच्या काळात ज्याला मार्केटिंग तंत्र म्हटलं जातं, त्यापासून या चळवळी उभारणा-या संस्था दूर आहेत. तेव्हा त्यांचं अस्तित्व आणि योगदान बरंचसं अदृश्य राहणं स्वाभाविक आहे.
‘पन्नाशी सामाजिक महाराष्ट्राची’ या पुस्तकात हे योगदान साकार होतं, तेव्हा या चळवळींचे आकार आणि प्रकार स्पष्टपणे समोर येतात. आणि त्याची व्याप्ती पाहून थक्क व्हायला होतं. जागतिकीकरण, उदार आर्थिक धोरण यातून उसळलेल्या खाजगीकरणाच्या महापुरात मोठय़ा चळवळींची पडझड सुरू झाली. पण महापुरात मोठे वृक्ष कोसळून पडावेत आणि लव्हाळी वाचावीत तशा या लहानलहान चळवळी या पुरात आजही समर्थपणे टिकून राहिल्या आहेत.