कैलास दौंड
26 Feb 2019 09 57 PM
भोग सरू दे उन्हाचा हा मराठी ग्रामीण कवितेतील महत्त्वाचा कवितासंग्रह आहे. मराठी ग्रामीण साहित्याचे आद्य प्रवर्तक आनंद यादव यांनी पाठराखण लिहून या कवितासंग्रहाचे कौतुक केले आहे. आजच्या बदलत्या ग्रामजीवनाच्या अनेक पैलूंवर आणि मूल्य व्यवस्थेवर भाष्य करणारीच ही कविता वाचकांच्या आणि अभ्यासकांच्या पसंतीस उतरलेली आहे.