Summary of the Book
ख्रिस्टिन रुपेनियन या अमेरिकन लेखिकेच्या 'न्युयॅार्कर' मधील 'कॅट पर्सन' या 'बेस्ट-सेलर' कथेमुळे (कथासंग्रह='यूनो ,यू वॅान्ट धिस')आंतरराष्ट्रीय कथाप्रेमींचं वाचनवर्तुळ संपूर्ण २०१८ साल घुसळून निघालं होतं!
पण 'कॅट पर्सन' पेक्षाही उत्कंठावर्धक कथाविषय, सूक्ष्म निरीक्षण, भावभावनांचं संवेदनशील प्रकटीकरण-यांमुळे ज्यांच्या कथा ७५ वर्षानंतर आजही अम्लान आहेत, त्या कथाव्रती अरविंद गोखले यांची जन्मशताब्दी आमचं निसुर सरकार सोयिस्करपणे विसरतं!
मात्र काळजांत रुतून बसलेल्या कथांमुळे आजही गोखल्यांना विसरू न शकलेल्या रसिकांनाच ही जन्मशताब्दी उत्स्फूर्तपणे कशी साजरी कराविशी वाटली,याचा हा अनवट वेध सव्वीस निवडक गोखले-कथांसह...