Summary of the Book
पक्षी हे मानव-समूहाचे एक अविभाज्य असे अंग असल्याचे मानव-जातीचा इतिहास सांगतो.
प्राचीन कथा-वाङ्मयात, काव्यात, ग्रामीण आणि नगर गीतांत मानवी जीवनाशी निगडित असलेल्या विविध पक्ष्यांचे विपुल संदर्भ आढळतात. त्यांच्या मधुर कूजनाने मन कसे भारले जाते, याचा विलक्षण अनुभव तर आपण नेहमीच घेतो.
आपण फक्त पक्षी `ओळखतो’; परंतु त्यांचे वैशिष्ट्यपूर्ण रंगरूप कसे, आकार केवढा, त्यांचे खाणेपिणे काय, त्यांचे गायन-त्यांची भाषा कशी, त्यांचे प्रियाराधन कसे, ते जोडी कशी बांधतात, आपल्या पिलांचे संगोपन व संवर्धन ते कसे करतात, यांविषयी तुम्हां-आम्हांला असायला हवी, तेवढजी माहिती असत नाही. ही माहिती घेत असतानाच पक्षि-निरीक्षणाचाही आनंद कसा घ्यावा, याचे मार्गदर्शन अनुभवी पक्षितज्ज्ञ बी.एस्. कुलकर्णी यांनी ललितरम्य भाषेत केले आहे.