Summary of the Book
शीख धर्माचे संस्थापक गुरुनानक यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या घटनांची माहिती, तसेच त्यांच्यानंतरच्या नऊ गुरूंच्या कामाची माहिती हे पुस्तक सविस्तररीत्या देतं. ज्येष्ठ पत्रकार खुशवंतसिंग यांनी लिहिलेल्या या पुस्तकात शिखांच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेल्या "गुरू ग्रंथसाहिब' या पवित्र ग्रंथाची माहिती, तसेच शीख धर्मातील धार्मिक सुधारणा याबद्दल माहिती आहे. ब्रिटिशांविरुद्धचा लढा, फाळणीचा कालखंड आदी तपशीलही यात येतात. प्रशांत तळणीकर यांनी मूळ इंग्रजी पुस्तकाचा अनुवाद केला आहे.