Summary of the Book
गेल्या पाच दशकांहून अधिक काळ सातत्याने भयकथा लिहूनं वाचकांना विस्मयाचकित करणारे नारायण धारप यांचे 'अनोळखी दिशा' हे पुस्तक म्हणजे आजवर त्यांनी लिहिलेल्या निवडक भयकथांचा संग्रह आहे.
अनपेक्षित व अकल्पित असें दृश्य दिसले, भास झाला किंवा घटना घडलीकी माणसाला भीती वाटते. हेच सूत्र पकडून धारप आपल्या कथांतून हुबेहूब चित्रण करतात. त्यामुळे त्यांच्या भयकथा वाचताना एक थरारक आणि रोमांचक अनुभव वाचकांना येतो. साहजिकच त्यांच्या कथा वाचकप्रिय ठरल्या आहेत.
असंभवनीय अथवा निव्वळ योगायोगाच्या वाटणाऱ्या तर्कशुद्ध कार्यकारणभावाने स्पष्ट करण्याची धारप यांची हातोटी आणि सुरम्य शैली असल्याने सुजाण वाचकांप्रमाणेच सर्वसाधारण वाचकही धारप यांच्या कथांचा आस्वाद मोठ्या चवीने घेतात.