BOOKS
BOOKS
eBOOKS
eMAGAZINES
AUTHORS
PUBLICATIONS
 
Search

शब्दवेड
Pages: 86
Weight: 105 Gm
Binding: Paperback
Share This Link:
https://www.bookganga.com/R/7ZGGW

Available Immediately

 
Hard Copy Price: 10% OFF  R 100 R 90 / $ 1.29
(Inclusive of all taxes) + FREE Shipping*  
FREE Delivery in Maharashtra on orders over ₹499.00
For International orders shipment charges at actual.
Buy Book
Add to Cart

 
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available

 
Preview
Summary of the Book
विश्वाच्या कणाकणाशी
एकरूप माझा प्राण आहे ,
पसायदानवादी उरलो मी
हेच याचे प्रमाण ||
ज्ञानदेवाचा आहे रेडा मी
तुकोबाची माळ आहे ,
गोरोबाचे चाक अन्
कान्होपात्राचे चाळ आहे ,
नरहरीच्या ऐरणाचे
अजूनही मला भान आहे ,
पसायदानवादी उरलो मी
हेच याचे प्रमाण आहे ||
निळोबाची ओढ गुरूची
जनाबाईचे दास्यत्व आहे ,
नामयाची आहे पताका नि
पुंडलिकाचे भक्तत्व आहे ,
शेख मुहम्मद , सोपानकाका
दोन्ही मला समान आहे ,
पसायदानवादी उरलो मी
हेच याचे प्रमाण आहे ||
एकाच्या भारूडातील पात्र
चोखोबाची जात आहे ,
सेनाचा आहे वस्तरा अन्
सावताची मी पात आहे ,
मुक्तीईला कलियुगातही
ताटीचे जसे भान आहे ,
पसायदानवादी उरलो मी
हेच याचे प्रमाण आहे ||
आळंदीचा सुवर्णपिंपळ
भिवरेची वाळू आहे ,
नसानसांतून भिनलेला
विठ्ठल माझा कनवाळू आहे ,
निवृत्ती , ज्ञाना , विसोबाचे
पंथ सारेच समान आहे ,
पसायदानवादी उरलो मी
हेच याचे प्रमाण आहे ||
Write a review
* Rating:

* Name:
* Email Address:
(Email is not visible to others)
* Comments:
 0/1024
* Verfication Code:
 

RECENTLY VIEWED
Login
Use MyVishwa.com
username or email to login.
Username / Email Address
Password
Forgot Password?
Signup
First Name
Last Name
Gender
Your Email Address
Choose Password
Country

Forgot Password?
Forgot Password
Email Me My New Password
Username Or Email Address