Hard Copy Price:
25% OFF R 300R 225
/ $
2.88
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available
Summary of the Book
आजच्या शिक्षणव्यवस्थेवर बोट ठेवणारी ही प्रसाद कुमठेकर यांची कादंबरी आहे. 'शिक्षण व्यवस्थेवर थेट दोषारोप न करता तिच्यातील विसंगती उघड करताना तिचा उत्सव होऊ न देता आणि औदासिन्य निर्माण न करण्याची सहजकृती ही कादंबरी करते. शालेय पातळीवर विद्यार्थ्यांच्या विकासासाठीचे सौहार्दाचे वातावरण निर्मित करण्यासाठीचे थेट अपील या कादंबरीत आहे' असे गणेश आत्माराम वसईकर या पुस्तकाबद्दल सांगतात.
क्रिकेट खेळताना हरवलेल्या बॉलची नुकासानभरपाई करण्यासाठी अर्धवेळ शाळा बुडवून बगळे विकण्यासाठी ते पकडण्यापर्यंत कराव्या लागणाऱ्या धडपडी, हे या कादंबरीचे सूत्र आहे. या लहानग्या नायकाबरोबर वैशिष्ट्यपूर्ण भाषेत लिहिलेली त्याच्या कुटुंबाचीही ही कथा आहे.
सुरेख निर्मिती आहे. उदगिरी बोलीचा चपखल वापर केलेला आहे. अगदी अर्पण पत्रिकेपासून कादंबरी वाचकाला घट्ट खिळवून ठेवते. मंडणीतील सहजता, लेखनातील अघळपघळपणा, विशेष म्हणजे अनुभवांशी लेखकाचं असलेला प्रामाणिकपणा मला विशेष भावला. शाळकरी मुलांचं भावविश्व अत्यंत संयमाने तितक्याच गांभीर्याने व ताकदीने आपण मांडलंय. पहिलीच निर्मिती असली तरी पहिलटपणा कुठेही जाणवत नाही . फॉण्टची केलेली निवड वाचकाला कादंबरीसोबत खिळवून ठेवायला पूरक ठरते. कवी गणेश वसईकरांनी पुस्तकाला दिलेली पाठराखण मित्र असले तरी तटस्थ आहे.
आज तिशीच्या आसपास असलेल्या सगळ्याच ग्रामीण , वा खेडं वजा नागरी परिसरात जन्मलेले, वाढलेले सगळेच या अनुभवातून गेलेत, मी देखील यापिढीचाच असल्यामुळे हा अनुभव मला माझा वाटतो. बाह्यांगाने कादंबरी खूपच सुंदर वाटली, अंतरंगात शिरतांना थंडीच्या दिवसात उबदार चादर अंगावर ओढल्याचा भास होतोय, एकदम मस्त. दिलखुलास लिहितात तुम्ही
गणेश सूर्यवंशी
चिंचखेड सीम
ह.मु. जळगाव.
महादेव राऊत
09 May 2017 05 30 AM
अप्रतिम अप्रतिम कादंबरी। भाषिक अंगाने तर परिपूर्ण आहेच, समीक्षेच्या सर्व पातळीवर ती सरस ठरते। यापेक्षा ही लहान मुलांच्या भावविश्वाचे आंतरिक नात्याचे अफलातून वर्णन केले आहे। अफलातून हा शब्द जाणीवपूर्वक वापरतो।
Ganesh Chavan
09 May 2017 05 30 AM
प्रसाद कुमठेकर लिखित "बगळा" हे पुस्तक खराखुरा
अनुभव देत. पुस्तकाचं नाविन्य म्हणजे लिखाणाची
शैली आणि कथेची आगळी वेगळी मांडणी. पुस्तकाची भाषा ही बोलीभाषे सारखी खरीखुरी आहे. म्हणूनच पुस्तकातील व्यक्तिरेखा कलपनेत न अडकता, सहजपणे आपल्या समोर उभ्या राहतात, अलगद हसवतात,
आणि जगु ही लागतात.
इतका सच्चा अनुभव देणार "बगळा" हे पुस्तक प्रत्यकाने वाचावं !