Summary of the Book
आभाळ सावल्यांचे हे पराग घोंगे यांचे नाटक आयुष्याच्या संध्याकाळी सर्वसामान्य माणसाच्या मनात नकळत डोकावणाऱ्या पिवळ्या उन्हाचे नाटक आहे. या अवस्थेशी माणसे कशी जुळवून घेतात आणि कधी-कधी या प्रयत्नात त्यांची कशी तारांबळ उडते याचे खेळकर चित्रण या नाटकातून घडते. सगळे खेळ शेवटी माणसांसाठीच निर्माण झाले असतात आणि ते त्याच्या आनंदासाठीच खेळले जातात याकडे हे नाटक लक्ष वेधते...