Summary of the Book
श्री. वसंत नरहर फेणे गेल्या तीस-बत्तीस वर्षांपासून कथा लिहीत आहेत. माणसामाणसांतल्या संबंधांचे खूप खोलवर जाऊन शोध घेण्याचे प्रयत्न फेणे यांची कथा करते. त्यांचे कथाविश्व खूप विस्तृत आहे. वृद्धांची एकटेपणाची भावना त्यांच्या कथांतून प्रभावीपणे व्यक्त होते.
फेणे यांचे मराठी कथेतील पृथगात्म वैशिष्ट्य म्हणजे देशांतर्गत व परदेशातील राजकीय वातावरणाचे चित्रमय रेखांकन करून ते जी माणसांची मने रंगवितात ती मराठी कथाविश्वात काहीशी आगळी आहेत. राजकीय ताणतणाव आणि राजकीय प्रवाहात झोकून दिलेल्या माणसांच्या व्यथा आणि यातना मार्मिकपणे त्यांनी व्यक्त केल्या आहेत. फेणे यांच्या कथेत चिंतनाचा मजबूत धागा असतो. त्यामुळे त्यांची कथा उंचीवर जाते.