Summary of the Book
बाकी सारे प्राणी निव्वळ प्रजोत्पादनासाठी समागम करतात. माणूस हा अपवाद. माणूस संभोगातून सुख मिळवतो. समागमातून समाधान प्राप्त करतो. माणसाने मैथुन शुद्ध मौजेसाठी असू शकते. माणसाचे लैंगिक वर्तन नैसर्गिक निवडीतून सिद्ध झाले आहे, हे अटळ सत्य आहे. उत्क्रांतीच्या ओघात निव्वळ शरीर- रचनाच नाही तर वागणूकही उत्क्रांत होत जाते. मग हे वर्तन म्हणजे बालसंगोपन असो, स्तनपान असो की ऋतूनिवृत्ती असो; ह्यात प्रत्येकाचा आणि प्रत्येकीचा जनुकीय स्वार्थ दडलेला आहे असे जीवनशास्त्र सांगते. स्त्री ही पत्नी आणि अनंतकाळाची माता आहे, तर पुरुष हा स्खलनाच्या क्षणापुरता पती आणि फलनाच्या क्षणापुरता पिता आहे.