Hard Copy Price:
25% OFF R 425R 319
/ $
4.09
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
#कादंबरी
#झेबुनिस्सा
#वाचनवेडा
#रुचिर_गुप्ता
#सीमा_भानू
एखाद्या ऐतिहासिक चित्रपटाचं शीर्षक चित्रपट गृहातील पडद्यावर उमटावं अगदी तसेच ह्या कादंबरी चं शीर्षक आपल्या मनपटलावर उमटतं "झेबुन्नीस्सा एक बंडखोर शहजादी औरंगजेब कन्येची पडद्यामागील कहाणी"
आपल्याला माहीत असलेल्या औरंगजेब च्या क्रूरतेत ही कादंबरी वाचून अजून भर पडते.
आपल्या सगळ्यात प्रिय शहजादीच्या प्रियकरास गुंगी देणारं पेय पाजून शेहंशाह आलमगीर ने सुलेमान ला ज्या क्रूरतेने मृत्यूपंथाचा रस्ता दाखवला त्याचा बदला घेण्याचीच ही कहाणी आहे.
किंबहुना ही फक्त आणि फक्त प्रियकराच्या हत्येच्या बदलाची नाही तर समस्त हिंदुस्थान भर ह्या स्वतःस आलमगीर म्हणवणाऱ्या आणि देशात साऱ्याच कलांवर बंदी आणणाऱ्या बादशहाच्या आयुष्याची वाताहत आहे.
बाबर पासून चालत आलेली ही मुघल सलतनत पिढी दर पिढी मयूर तख्तासाठी हपापलेलीच होती हे ही ह्या कादंबरीतून दिसून येते.
ह्या सर्वात जमेची बाजू असते झेबुनिस्सा आणि तिच्या झुब्दत, मिहिर, बद्र आणि झीनत ह्या चार बहिणींनी खुफिया शायर महफील "मखफी" ची ह्या मखफी व्दारे त्या पाची जणी आपल्या असुरी वडिलांना पदच्युत करून राज्याला न्याय मिळवून देण्यासाठी बंडखोरी चा प्रयत्नांत असतांना त्याची ही बंडखोरीच बिंग फुटतं. पण तो पर्यंत आलमगीर शरीराने खंगत आलेला असतो.
औरंगजेबाच्या एका पुत्राबाबतील कादंबरीत रहस्यमय बाब वाचण्यात येते. अकबर हा औरंगजेबाचा पुत्र नसून तो त्याचा नातू असल्याचा पुरावा आपल्याला मिळतो. झेबुनिस्सा व त्यांनाच शिकवण्यास ठेवलेला औरंजेबाचा विश्वासू सहकारी अकिल खान. हा ही औरंजेबाच्या गोटात राहून हवी ती माहिती मखफी ला पोहचवत असतो. बरीच वाचनीय माहिती आणि पट्टीच्या वाचणाऱ्यांने काही तासात ह्या कादंबरीच्या तीनशे पृष्ठांचा वाचून चौथा करावा अशी ही एका बेडर बेखोंफ शहजादी आणि तितक्याच उलट्या काळजाच्या आलमगीराची त्याचसोबत लक्षात राहतील अशा व्यक्तिरेखांनी आणि रोमांचक घटनांनी परिपूर्ण अशी ही कहाणी.
झेबुन्नीस्सा एक बंडखोर शहजादी औरंगजेब कन्येची पडद्यामागील कहाणी
लेखिका:- रुचिर गुप्ता
अनुवाद:- सीमा भानू
प्रकाशक:- विश्वकर्मा पब्लिकेशन