Summary of the Book
श्रीगणेशाचे आगमन घरोघरी तसेच सार्वजनिक मंडळात झाले आहे. गणेशोत्सव आनंद, उत्साह, चैतन्य घेऊन येतो. म्हणूनच आपण त्याला लवकर परत येण्याचे निमंत्रणही देतो. गणपती हे दैवत अतिप्राचीन समजले जाते. त्याच्या वेदातील स्थानाची महती गजानन शंकर खोले यांनी 'ओमकार गणेश'मधून सांगितली आहे.
वेद उपनिषदे - पुराणांमधील ओमकार गणेश, त्याचे जगदव्यापी रूप, प्रार्थना, त्याचे विविध ग्रंथामधील संदर्भ, गणेश जन्मकथा, पार्थिव गणेशमूर्तीची पूजा, पुराणातील २१ गणपती, त्याविषयीच्या कथा, गणेशाची साडेतीन पीठे, अन्य पुरोणोक्त प्रांतीक गणपतीतील हिमालय, आसाम, नेपाळ, बिहार, पंजाब, उत्तर प्रदेश, बंगाल, गुजरात, राजस्थान, आदी राज्यांमधील स्थाने,
महाराष्ट्रातील गणेशस्थाने, संकटनाशन, गणपतीस्तोत्रम, ब्रम्हणस्पती सूक्त, श्रीगणपती अथर्वशीर्ष, त्याचा अर्थ, चतुर्थीचे माहात्म्य, श्रीगणेश सहस्रनामाचे वर्गीकरण, त्याचा भावार्थ, गणेशाची पत्री, अनंत चतुर्दशीचे महत्व, पृथ्वी महात्म्य, गणेशाची नावे व त्याचा अर्थ, गणपतीची वाहने, पंचखाद्य, गणेशाची व्रते, अंक २१ ची महती यात दिली आहे.