Summary of the Book
भाषेचा वापर न करताही आपण अवघ्या देहातून दुसऱ्यांना कितीतरी सांगत असतो. दुसरी माणसंही त्यांच्या देहाच्या हालचालीतून आपल्याला काही सांगत असतात. या जाणीवेचा रोजच्या जगण्यात माणूस कळून घेण्यासाठी, व्यक्तिमत्व विकासासाठी वापर करावा आणि देहबोली जाणता आल्यावर त्याचा व्यवहारात चातुर्याने वापर उपयोग करावा असा संदेश लेखिका अंजली पेंडसे यांनी या पुस्तकातून दिला आहे.
पुस्तकाचे एकूण ११ भाग आहेत. शब्देविणे संवादू, खुणा, हातांच्या हालचाली, हस्तांदोलन, स्मित-हास्य, डोळे आणि 'लक्ष्य' 'अंतर'ज्ञान, भावभावनादर्शक हालचाली, सत्तेची बोली, देशोदेशीची देहबोली या मुद्यांवर लेखिकेने स्वतंत्रपणे चर्चा केली आहे. पुस्तकात जागोजाग चित्रांचा सुयोग्य वापर केला आहे.