Home
>
Books
>
ऐतिहासिक
>
Chhatrapati Shivaji Maharajanche Samrajya Gujarat Te Srilanka - छत्रपती शिवाजी महाराजांचे साम्राज्य गुजरात ते श्रीलंका
छत्रपती शिवाजी महाराजांचे साम्राज्य
गुजरात ते श्रीलंका
9789384091958AitihasikChhatrapati Shivaji Maharajanche SamrajyaEtihasGujarat Te SrilankaHistoricalHistoryLokayat PrakashanNeeraj SalunkeNiraj SalunkeShivaji MaharajShivaji Maharajanche SamrajyaShivaji Rajeइतिहासऐतिहासिकगुजरात ते श्रीलंकाछत्रपती शिवाजी महाराजछत्रपती शिवाजी महाराजांचे साम्राज्यनीरज साळुंकेलोकायत प्रकाशनशिवाजी महाराजशिवाजी महाराजांचे साम्राज्यशिवाजी राजे
Hard Copy Price:
25% OFF R 270R 202
/ $
2.59
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
मुघल व निजामशाहीच्या दक्षिणेकडील संघर्षात निजामाने एतद्देशीय मराठ्यांना हाताशी धरून आक्रमण थोपविण्याचा प्रयत्न केला . यातूनच मराठ्यांचा लष्करी विकास होऊन मराठा राज्याचा उदय झाला . या विकासाचा महत्वाचा टप्पा म्हणजे शहाजी महाराज , असा इतिहासाचा दाखला देत डॉ. नीरज साळुंखे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे साम्राज्य'तून शिवाजी महाराजांच्या राज्याविस्ताराचा आढावा घेतला आहे . मराठा राज्य हे शहाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची एकत्रित कृती होती , हे लक्षात घेऊन याची मांडणी केल्याचे लेखक सांगतात . यामुळे कुकळ्ळीच्या धर्मयुद्धापासून मराठ्यांची घराणी , शहाजी महाराजांचा स्वतंत्र कारभार व त्यांची जहागिरी , दक्षिणेकडील मोहिमा यांचा इतिहास येतो. एकोजीराजांचे तंजावरचे राज्य , शिवाजी महाराजांच्या दक्षिणेतील स्वाऱ्या व विजय , तेथील मंदिरे , किल्ले यांची ,माहिती , असा गुजरात ते श्रीलंकेपर्यंतच्या शिवसाम्राज्याचा इतिहास येथे संदर्भ छायाचित्रांसह दिला आहे.
डॉ. श्री नीरज साळुंके सरांचा हा ग्रंथ म्हणजे इतिहासप्रेमींसाठी एक पर्वणी आहे,
संदर्भ पुर्ण मांडणी, सोपी भाषाशैली आणि सविस्तर लिखाण हे या ग्रंथाचे वैशिष्ट्य आहे,
छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील एक नवीन पैलू आपणास थक्क करून जातो यात शंकाच नाही..
Kamaji Dak
26/02/2019
छत्रपती शिवाजी महाराजांचे साम्राज्य (गुजरात ते श्रीलंका) – डॉ. नीरज साळुंखे
मराठा इतिहासाचे अभ्यासक डॉ. नीरज साळुंखे यांनी शिवरायांच्या इतिहासातील अपरिचित व दुर्लक्षित पैलूंवर संशोधन करुन छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यविस्ताराबाबत सविस्तर मांडणी केली असून ही मांडणी आता ग्रंथरुपात लोकायत प्रकाशन, सातारा यांनी “छत्रपती शिवाजी महाराजांचे साम्राज्य (गुजरात ते श्रीलंका)” या शिर्षकासह वाचकांच्या हातामध्ये 19 फेब्रुवारी पर्यंत पडणार आहे.
इतिहासाचे लेखन, पुनर्लेखन होणे तेही सातत्यांने होणे ही एक आवश्यक बाब आहे. मराठ्यांच्या इतिहासाचे विशेषत: छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरित्राचे पुनर्लेखन होने हे अत्यंत आवश्यक आहे. यामुळे त्यांच्या चरित्रावर नव्याने प्रकाश टाकला जाऊ शकतो. बऱ्याच इतिहासकारांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर लिखाण केले आहे, असे असतांना देखील डॉ. नीरज साळुंखे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या साम्राज्य विस्तारावर समकालिन अस्सल साधनांचा सखोल अभ्यास करुन त्याची चिकित्सक मांडणी केली आहे.