Summary of the Book
मानवी पेशीच्या आत, तिच्या गल्लीबोळांतून, तिच्या अंधाऱ्या वाटांवर काय चालते आहे? एकमेकांशी कसे संवाद करतात पेशीतील घटक? कोण करते त्यांचे नियंत्रण आणि त्यांच्यात बिघाड झल्यावर तो दुरुस्त करण्याची किल्ली कोणती? विज्ञानाचा प्रकाश जर ह्या अंधाऱ्या वाटांवर पडला, तर..? तर मग निसर्गाची कितीतरी रहस्ये उलगडतील. सिकल सेल अॅनिमिया , मधुमेह, हृदयविकार.. सारे सारे विकार एका झटक्यात दूर होतील. हवीय फक्त एक रामबान चीप.. मानवजातीचा कल्याण करू पाहणारे आणि तसा गर्व वाहणारे वैज्ञानिक, त्यांच्या ज्ञानाचा वापर नफेखोरीसाठी करणाऱ्या कंपन्या, त्यांचे गर्वहरण करणारा निसर्ग आणि ह्या सर्वांमधून वाहत असणारा मानवीय संबंधांचा झुळझुळ झरा.. ग्रीक पुराणकथा, भारतीय अद्यात्म आणि गुंतागुंतीचं विज्ञान ह्यांचे मर्म ओघवत्या भाषेत मांडणारी, विज्ञानभानासोबत मूल्यवान जागविणारी प्रभावी थ्रिलर कादंबरी.