Summary of the Book
‘पुरुषस्पंदनं’ चा यंदाचा दिवाळी अंक ‘लैंगिकता व समाज’ या विषयावर आधारित आहे. हा अंक वैशिष्ट्यपूर्ण असाच आहे. या अंकात लेखक, चित्रकार, कवी यांनी लैंगिकतेच्या विविध पैलूंचा वेध घेतला आहे. मेघना पेठे, अवधूत परळकर, डॉ. मनोज भाटवडेकर, डॉ. विठ्ठल प्रभू, मनस्विनी, लता रवींद्र, नीरजा, प्रज्ञा पवार अशा मान्यवर लेखकांचे साहित्य या अंकात वाचायला मिळते. या अंकात लैंगिकतेसारख्या संवेदनशील विषयावरचे अभ्यासपूर्ण लेख वाचायला मिळतात.
मराठीत साहित्यात अद्याप फारसे न मांडलेले अनोखे अनुभव या अंकात वाचायला मिळतात. चित्रकलेच्या क्षेत्रातील लैंगिकतेच्या सौंदर्यपूर्ण अभिव्यक्तीचे चित्रण करणारे लेख वाचायला मिळतात. समलैंगिकता या विषयावरही प्रगल्भपणे विचार मांडणारे लेख वाचकाला विचार करायला लावतात. लैंगिकतेचा सर्व अंगांनी विचार करायला लावणारा हा अंक वाचनीय झाला आहे.