Summary of the Book
एक अतिशय चतुरस्त्र व्यक्तिमत्त्व आणि संवेदनशील कलाकार असणारे विदुर महाजन गेली २५ वर्षांहून अधिक काळ माझे मित्र आहेत. संगीतज्ञ, सतारवादक, कवी, लेखक, पर्यटक अशा विविध पैलूंनी त्यांचे जीवन समृद्ध आहे ! त्यांच्या कवितांमधून त्यांनी माणसांशी जोडलेली, जपलेली नाती आणि त्यांची दिलखुलास फकिरी वृत्ती यांचा वारंवार प्रत्यय येत राहतो.
त्यांनी आजवर अनेक कलावंतांबरोबर कार्य केले आहे. विदुषी किशोरी आमोणकर यांच्या गाण्यावरची त्यांची श्रद्धा केवळ अद्वितीय आहे. 'तू यमन वाजवताना' या त्यांच्या कवितेतून त्यांनी रागसंगीत आणि गुरु - शिष्य परंपरेच एक अभूतपूर्व विश्व उलगडून दाखवले आहे.
आयुष्याच्या प्रत्येक टप्प्याचे महत्त्व समजून, उमजून जगलेले विदुर महाजन यांचा मला अतिशय आदर आणि अभिमान आहे ! त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आणि या पुस्तकासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा !