Hard Copy Price:
25% OFF R 795R 596
/ $
7.64
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available
Preview
Summary of the Book
महाराष्ट्राच्या जागृतीची पहाट श्रीशिवरायांच्या अद्भुत कर्तृत्वातून अवतरली आणि स्वराज्याचा महन्मंगल अरुणोदय झाला. त्यानंतरची छत्रपती शंभूराजांची सारी नऊ वर्षांची कारकीर्द; पण अशी विलक्षण की कल्पित कथेलाही फिकी ठरवील. मानवी जीवनाचे एवढे उत्कट, अचाट आणि रोमांचकारी दर्शन इतिहासाचे क्वचितच घेतले असावे. 'राजेश्री आबासाहेबांचें जें संकल्पित तेंच करणें आम्हांस अगत्य,' हे त्यांच्या छत्रपतित्वचा अनुष्ठानाचे सूत्र होते आणि आपल्या जीवनाची आहुती देईपर्यंत ते त्यापासून कधीही ढळले नाहीत. त्यामुळेच त्यांच्या अतुल्य बलिदानानंतरच्या अभूतपूर्व परीस्थितीत महाराष्ट्र असा काही खवळून उठला की, त्या अंगारात औरंगजेबाच्या बादशाहीची निम्म्याहून अधिक वर्षे होरपळून निघाली. महाराष्ट्राच्या जिवाची घालमेल शंभूराजांच्या कालखंडात एकसारखी वाढत गेली आणि अखेर तो रुद्र कोपला. मनाला गलबलवून टाकणाऱ्या त्या कालावधीतील अनेक गुंतागुंतीच्या आणि अज्ञात घटनांचे पदर उलगडून सांगणाऱ्या शंभूराजांच्या ह्या चरित्राइतके साधार, विस्तृत आणि समतोल भूमिकेने लिहिलेले दुसरे चरित्र नाही, असा निर्वाळ महाराष्ट्राच्या इतिहाससमीक्षकांनी एकमुखाने दिला आहे.
सदाशिव शिवदे सरांनी यांनी यात छत्रपती संभाजी महाराजांच्या चारित्र्यावर अतिशय द्वेषातून शिंतोडे उडवले आहेत. तसेच संभाजी महाराजांच्या समाधिस्थळास वधस्थळ असे संबोधले आहे. यात एक नाही दोन नाही तर १३ वेळेस संभाजी महाराजांच्या हत्तेला वध असे संबोधले आहे. यात सदाशिव शिवदे एकतर्फीच लिखाण करतात. द्वेषातून लिहलेला संदर्भ ग्रंथ आहे हा.
Yashwant shinde
07 Mar 2018 05 30 AM
पुस्तक खूप छान आहे .उत्तम लिखाण
Dipak Warghade
15/10/2017
खूप छान पुस्तक आहे.
Rohit
16/12/2014
Best book ever written on sambhajiraje.
This is total reference book.