Summary of the Book
भारत विविधतेने नटलेला आहे. अनेक जाती-धर्मांचे लोकं येथे एकत्र नांदतात. याचा अनुभव प्रशासकीय सेवेत असताना श्रीकृष्ण सवदी यांनी घेतलं आणि 'अनोखे प्रवास अनोखे अनुभव'मधून तो वाचकांपर्यंत पोचविला आहे. विविधतेने नटलेले प्रदेश, निसर्ग, घटना, माणसांचे अनुभव यात दिले आहेत.
सीमा रस्ते संघटनेच्या (बोर्डर रोड्स ऑर्गनायझेशन) सेवेत असताना सिक्कीममधील महानंदा अभयारण्याजवळून जाताना भेटलेले नक्षलवादी, नक्षलवाडी येथे अचानक दिसलेला चारू मुझुमदार, पश्चिम बंगाल-सिक्किम वाटेवरील दोन भीषण अपघात, रांगपो गावाजवळ दरडीमध्ये घालविलेली रात्र, सिक्किममधील विस्मयकारी अनुभव, तवांगच्या प्रवासातील बौद्ध मठाची भेट दिग्बोईचा वाटाड्या बालहत्ती, लेहमध्ये सिंधू नदीच्या तीरावरील प्रवास, कच्छच्या रणाचा मनोरंजक प्रवास, उत्तराखंडमधील गावात भेटलेली आधुनिक द्रौपदी, कोणार्कचे सौंदर्य, व्हेनिस, पॅरिस, स्वित्झर्लंडची सैर, रेल्वे प्रवासात भेटलेले मसालेवाईक सहप्रवासी यांचे ओघवत्या भाषेतील वर्णन वाचताना आपण जणू त्यांच्यासोबत प्रवास करीत असल्याचा अनुभव येतो.