Summary of the Book
जात-धर्म हे माणसाला जन्मापासून चिकटतात. मैत्री, प्रेम याला कोणतीही भाषा नसली तरी विभीन्न धर्म त्याच्या आड अनेकदा येऊ शकतात. दोन धर्मांत वाढलेल्या दोन जीवांची घालमेल बोळूवारू महमद कुयनी यांनी जेहाद मध्ये टिपली आहे, परंपरेचा पगडा असला तरी मनाने सुधारित असलेली माता मुलांना शाळेत घालते. तेव्हापासून सुरु झालेले दोन धार्मिक द्वंद्व कादंबरीचा नायक रशीदच्या मनात कायम खेळत राहते. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यात धर्माची आडकाठी येते. ज्या बहिणीचे कारण सांगून तो धर्माचा उंबरा ओलांडायला तयार नसतो, तीच तो ओलांडते तेव्हा त्याच्या मनात पराभूत झाल्याचे शल्य निर्माण होते. माणूस मोठा की धर्म, यात अडकलेल्या आणि परंपरावाद्यांना विचार करायला लावणारी ही कादंबरी आहे. तिचा मराठी अनुवाद डॉ. अ. रा. यार्दी यांनी केला आहे.