Summary of the Book
स्त्रीच्या जगण्याला असतो स्त्रीच्या जगण्याचा शाप. स्त्री हिंदू असो की मुसलमान की आणखी कुणी, तिच्या मूलभूत वेदनेला नसतो कोणत्याही धर्माचा भेद. तिची वेदना स्त्रीचीच वेदना असते. कोणताही धर्म स्त्रीचं जगणं नाचक्कीबाज आणि नीच करा असं सांगण्याची हिंमत करीत नाही. पण धर्माच्या भांडवलावर जगणार्या धर्मपालक औलादी धर्मच नाही तर माणूसपणाचेही नियम आबदार बासनात गुंडाळून, स्वत:चे स्वार्थी अनाचार जाती-धर्म-देवांच्या नावावर खपवत मुजोर जगतात. प्रत्येक धर्माला एक तरी देव असतो. आश्चर्य याचं वाटतं की, हे तमाम देव हा सगळा अनाचार पाहत शतकानुशतकं षंढ कसे राहू शकतात?