Hard Copy Price:
R 170
/ $
2.18
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available
Summary of the Book
`एकपानी’तल्या काही लेखांची मुळे मला कुठे सापडली याचा आज मी विचार करते तेव्हा मला गंमत वाटते. उदाहरणार्थ, `पत्रे’ या लेखातला मजकूर मला `व्होग’ किंवा `बझार’ अशा कुठल्यातरी इंग्रजी फॅशनविषयक मासिकात अचानक सापडला. `स्पॅन’ मासिक माझ्याकडे येते. त्यात वाङ्मयविषयक सुरेख लेख असतात. `लेखकाचा पुनर्जन्म’, `एक वेगळा संग्रह’ या लेखांचे विषय `स्पॅन’ मधल्या लेखनाने पुरवले.
कॉलेजमध्ये मी नोकरी करत होते तेव्हा आमच्या वाचनालयात येणारे `लंडन मॅगझिन’ हे मासिक अनेक वर्षे मी अगदी न चुकता वाचत असे. `अनुभव आणि कलाकृती’ हा लेख मी लिहिला तेव्हा `लंडन मॅगझिन’मधल्या एका खूप जुन्या कवितेची मला अचानक आठवण झाली होती आणि तिचा एकाएकी
वेगळाच अर्थ मला जाणवला होता.
अॅगाथा ख्रिस्ती ही माझी आवडती रहस्यकथा लेखिका. तिच्या `द हॉलो’ या रहस्यकथेतल्या एका प्रसंगातून `कलावंत’ या लेखामधली शिल्पकर्त्री मला भेटली. `तापसी शारदा’ हे माझ्या वडलांनी जमवलेल्या अनेक पुस्तकांपैकी आज माझ्या संग्रही शिल्लक असलेले एकमेव पुस्तक. त्याच्या अनुषंगाने `तापसी शारदा’ हा लेख मला सुचला.
फडके, खांडेकर, माडखोलकर हे माझे आणि माझ्या पिढीचे तरुण वयातले आवडते कादंबरीकार. तीच गोष्ट रविकिरण मंडळातल्या कवींची. या लेखककवींनी एके काळी मला खूप काही दिले. त्या वेळची माझी कोवळी अपक्व अभिरुची संस्कारित केली... या लेखकांच्या आणि कवींच्या मी एकेकाळी समरसून केलेल्या वाचनाचे पडसाद `एकपानी’तल्या अनेक लेखांमधून उमटल्यास नवल नाही.
या विविध स्वरूपाच्या पुस्तकांनी आणि मी करत असलेल्या बर्यावाईट भरमसाट वाचनाने `एकपानी’तल्या माझ्या कितीतरी लेखांना विषय पुरवले आहेत.... - प्रस्तावनेमधून