Summary of the Book
सह्याद्रीच्या डोंगररांगांमधील दुर्लक्षित गडकोटांची ओळख करून देणारा हा लेखसंग्रह आहे. भगवान चिले यांनी या अपरिचित गडकोटांचा इतिहास आणि भूगोलाची माहिती गडप्रेमींनी करून दिली आहे.
हनुमंतगड, बांद्याचा किल्ला, सदानंदगड, सिद्धगड, भैरवगड, पद्मनाभदुर्ग, पालगड, सोनगड, कोळगुर्द, पदरगड, सिंदोळा, बितनगड, रांजणगिरी, गडगडा, बहुलगड, देहेरगड, खैराईगड, अचला, कोळदेहेर, मेसणा, कात्रा आदी ४० गडांची ओळख या पुस्तकातून होते.
एखादा गड दुर्लक्षित का राहिला किंवा एखादा लक्षवेधक का आहे, एखाद्या गडाचा माथा कसा आहे, गडाची वैशिष्ट्य काय अशा अनेक बाजूनी चिले यांनी गडाला टिपले आहे. गडांची रंगीत छायाचित्रे आणि नकाशा हे पुस्तकाचे विशेष.