Summary of the Book
पुस्तकातून भेटणारे लेखक-कवी प्रत्यक्ष कसे असतात?
त्यांची बालपणापासूनची जडणघडण, बालपण, आईवडील, सवंगडी, शिक्षक, आजूबाजूचा परिसर, लेखनाला सुरुवात, त्यामध्ये मिळवलेला नावलौकिक आणि पुरस्कार, त्यांनी केलेले एखादे वैशिष्ट्यपूर्ण समाजकार्य- या सर्व गोष्टींविषयी मुलांना अपार कुतूहल असतं. त्यांना भेटण्याची इच्छा असते.
जनमानसात आदराचे स्थान असलेले कविश्रेष्ठ/नाटककार कुसुमाग्रज ऊर्फ वि. वा. शिरवाडकर यांचा जीवनप्रवास `कुसुमाग्रजः एक महामानव’ या पुस्तकातून श्रीमती प्रभा आपटे यांनी खास मुलांसाठी रेखाटला आहे. मुलांना समजेल अशी सोपी, सुबोध भाषा आणि ओघवती शैली यामुळे हे पुस्तक मुलांसाठी वाचनीय झाले आहे.