Summary of the Book
दिवाळी साहित्यफराळाच्या क्षेत्रात 'आवाज'चा आवाज दिवसेंदिवस वाढतोच आहे! आपली वेगळी शैली निर्माण करणाऱ्या 'आवाज'ने यंदाही आपल्या 'खिडकी'तून वाचकांच्या उत्कंठेला हात घातला आहे. सध्या टॉवरसंस्कृतीचा बोलबाला असतानाच अशोक पाटोळे यांनीही 'बटाट्याची चाळ' रिडेव्हलपमेंटला काढली आहे. तेच्याबरोबरच गंगाराम गवाणकरांचो मालवणी मसालोसुद्धा जोडयेक असा! अशोक जैन, भा. ल महाबळ, मुकुंद टाकसाळे यांच्या साहित्याबरोबर आवाजचा 'युएसपी' असलेली हास्यचित्र मालिका, हास्यचित्रे व चुटके नक्कीच वाचकांना हसवल्याशिवाय राहणार नाहीत.