Hard Copy Price:
25% OFF R 250R 188
/ $
2.41
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Notify Me Once Available
Our mission is to make all Indian literature available globally.
We will procure this book and make it available within next few days and we will notify you immediately via email / phone.
Notify Me Once Available
Summary of the Book
सुनील चिंचोळकर यांनी रामदासांच्या साहित्याचा सखोल अभ्यास केला आहे. त्यांनी मनाचे श्लोक हे मन:शांती मिळवण्यासाठी कसे उपयुक्त ठरतात, हे या पुस्तकातून समजावून दिले आहे. मनाच्या श्लोकातील विविध श्लोकांचे वर्गीकरण करून चिंचोलकर येथे त्यातील अर्थ विषयानुसार विस्ताराने समजावून सांगतात. मनाची ताकद मोठी आहे. मन प्रसन्न आणि शांत असेल तर अनेक मोठ्या संकटांवर मात करता येते. चिंचोलकर यांनी केलेले निरूपण मनाची शक्ती वाढवण्यासाठी मार्गदर्शक ठरते.
माणूस कशाच्या शोधात आहे, असा प्रश्न केला तर एकच उत्तरं द्याव लागेल, मन:शांतीच्या. मन:शांती बाहेरून नाही मिळत. ती आपल्या आताच शोधावी लागते. मात्र, ती मिळवण्याचा मार्ग अधिकारी व्यक्तींनी दाखविलेला आहे. समर्थ रामदासांचे मनाचे श्लोक हा त्यापैकीच एक मार्ग. सुनील चिंचोलकर त्यांनी त्या दृष्टीने श्लोकांचे विवेचन केले आहे.
विविध विषयांनुसार श्लोकांची विभागणी हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. सर्व चिंता या अशांत मनाची निर्मिती असते. त्यामुळे मन शांत झाले, तरमनुष्य चिंतामुक्त होऊ शकतो. मनाच्या श्लोकांत मन शांत करण्याचे सामर्थ्य आहे. समर्थांनी सुचविलेले विचार समजावून सांगण्याचा हा एक चांगलं प्रयत्न आहे.