Summary of the Book
डॉ .जोसेफ मर्फी म्हणजे मानवातील अंतर्भूत क्षमतांचा विकास करण्यासाठी धडपडणारं व्यक्तिमत्व !डॉ .जोसेफ मार्फीनी स्वतःवर विश्वास ठेवा (मूळ इंग्लिश पुस्तक: बिलीव्ह इन युअरसेल्फ )या पुस्तकात यशप्राप्तीचंरहस्य सांगितलंय. प्रत्येक व्यक्तीनं स्वतःच्या आंतरिक क्षमता वापरल्यास ती नक्कीच यशस्वी होऊ शकते,याविषयी त्यांनी मार्गदर्शन केलंय .प्रत्येक माणसात जन्मापासूनच अनेक क्षमता असतात.विचारांना दिशा दिल्यास माणूस आपल्या अंतर्मनाच्या या क्षमता जागृत करू शकतो .या क्षमतांच्या आणि दिशायुक्त प्रयत्नांच्या बळावर त्याची स्वप्नं सहज साकार होऊ शकतात.आजवर अनेक कवींनी ,कलाकारांनी , संशोधकांनी आणि उद्योजकांनी अंतर्मनाची शक्ती वापरून पद ,पैसा आणि प्रतिष्ठा प्राप्त केली आहे .तुम्हीही असं देदीप्यमान यश नक्कीच मिळवू शकता.