Summary of the Book
नेहमीचेच पदार्थ; पण करायचे कसे हे एखाद्या तज्ञाने सांगितले तर? अर्थातच आपण त्या पदार्थांकडे अधिक सजकपणे बघू लागतो आणि पदार्थ बिघडणार नाही, असा विश्वासही पक्का होतो. चारुशीला निरगुडकर यांचे हे पुस्तक वाचतना खरेतर त्यांनी सांगितलेले पदार्थ करून बघताना असा काहीसा अनुभव येतो. त्यांचे वैशिष्ट्ये म्हणजे हा पदार्थ कसा करावा हे त्या शिकवतातच, शिवाय तो कसा वाढावा हेही सांगतात.
भाज्या आणि भाताच्या विविध प्रकारांबरोबरच भाजण्या, मसाले, पिठे, चटण्या, लोणची, छुंदा यांच्या कृती त्यांनी सांगितल्या आहेत. वाळवणाच्या
पदार्थांचा आणि उपवासाच्या पदार्थांचा स्वतंत्र विभाग आहे. पिठ्ल्याचे आठ पदार्थ समजतात. कढी, मठ्ठा, मिल्कशेक्स, सरबते, जूस यांच्यासह
ज्यूस यांच्यासह पानसुपारी आणि विडे करायलाही शिकता येते.