Summary of the Book
पत्रकार या नात्याने डॉ. भारतकुमार राऊत यांना भेटलेल्या आणि नंतर त्यांच्या आयुष्याचाच एक भाग झालेल्या; पण आता हयात नसलेल्या २१ सुहृदयींच्या आठवणी स्मरण मधून सांगितल्या आहेत. यात दूरदर्शन वर बातम्या देणारी आणि पुढे एक यशस्वी अभिनेत्री म्हणून नावाजलेली
तेजस्वी स्मिता पाटील, 'आप जैसा कोई मेरे जिंदगी में आए' या कुर्बानी चित्रपटातील जगात प्रसिध्द झालेली पाकिस्तानी पॉप गायिका नाझिया
हसन यांच्याविषयी सांगितले आहे.
दूरदर्शन वरील 'साप्ताहिकी' कार्यक्रम घराघरांत पोहचवणारी 'फुलराणी' भक्ती बर्वे इनामदार, अवघ्या अकराव्या वर्षी पायात चाल बांधून फडावर नाचनाऱ्या विठाबाई मांग नारायणगावकर, कल्पकता, जिद्द, व्यवहार, चातुर्य यातून 'रिलायन्स इंडस्ट्री' स्थापन करणारे धीरूभाई अंबानी, हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे अशा अनेक दिग्गजांच्या आठवणी आहेत.
तसेच दुर्गा भागवत, प्रिया तेंडूलकर, कल्पना चावला, नीतू मांडके, प्रमोद महाजन,विलासराव देशमुख, शाहीर विठ्ठल उमप, गौतम राजाध्यक्ष, राजन वांदेकर, मार्गारेट थॅचर, ज्योतिर्भास्कर जयंत साळगावकर, नाना माने, गो. पु. देशपांडे, नय आपटे, खुशवंत सिंग यांच्या व्यक्तिमत्वाचे फारसे परिचित नसणारे वेगळेपणही यात सांगितले आहे.