Summary of the Book
मानसोपचारतज्ञ अंजली पेंडसे यांचे हे व्यक्तिमत्व समृद्ध करण्याची दिशा दाखवणारे पुस्तक सुक्ष्म निरीक्षण आणि सखोल माहितीतून
आपलं जीवन अधिक समृद्ध, अर्थपूर्ण करता येते आणि तीच देहवाणी आहे. असे लेखिका सांगतात. शब्द अपुरे पडतात तेव्हा शब्दाविण संवाद,
हालचालींचे अर्थ, बोली आणि देहबोली, सलगी आणि दुरावा, मलिकी हक्क कंगाल हसू आणि सुखाचं हसू, भावनांची आणि दृष्टीभेटीची देहवाणी,
चुंबन रहस्य, दृष्टीकोन बदलण्यासाठी, देहवाणी तरुणांची, मानेच्या हालचाली, आदर- अनादर, उत्तम संवाद साधण्यासाठी, ड्रायव्हिंग पहा आणि
स्वभाव ओळखा,अशा विविध विशेषांवर भाष्य केले आहे. देहवाणीचा अभ्यास केला, तर व्यक्तिमत्व विकासाबरोबरच इतरांना समजून घेणे ही सोपे होते.
पुस्तकात दिलेल्या माहितीचा वापर करून रोजच्या जीवनात अनेक सकारात्मक बदल घडवून आणण्याची दृष्टी मिळते.
मानसोपचारतज्ज्ञ अंजली पेंडसे यांचे "देहबोली'नंतरचे हे दुसरे पुस्तक. व्यक्तिगत जीवनापासून कार्यालयीन जीवनापर्यंत देहबोलीचा वापर कसा
करता येतो आणि या सार्यातून आपलं जीवन आणखी समृद्ध व अर्थपूर्ण कसं करता येईल, यासंबंधीचं तपशीलवार मार्गदर्शन या पुस्तकात करण्यात आले आहे.
21 प्रकरणांमधून लेखिकेने माणसाचे वागणे आणि त्याचा अर्थ याबद्दल सविस्तरपणे मार्गदर्शन केलं आहे. प्रभावी व्यक्तिमत्त्व कसं करता येईल इथपासून देहवाणी
आनंदाची कशी होईल यासंबंधीच्या टीप्स या पुस्तकात आहेत. देहबोलीचा शास्त्रीय अभ्यास करून त्याची माहिती मात्र सोप्या रंजक भाषेत येथे दिली आहे.
मुखपृष्ठापासून लक्ष वेधणार्या या पुस्तकातील विश्लेषणाने थक्क व्हायला होतं.