Summary of the Book
दहावीची परीक्षा हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या आयुष्यातला शब्दश: "कसोटी'चा काळ असतो. उच्च माध्यमिक परीक्षेच्या बदललेल्या स्वरूपानुसार प्रश्नपत्रिकेत समाविष्ट केलेल्या महत्त्वाच्या प्रश्नांना सामोरं जाण्यासाठी मार्गदर्शन करणारं "एकमेव सर्वसमावेशक हॉट्स' हे पुस्तक आहे. अशा प्रश्नांचा जास्तीतजास्त सराव हाच हमखास यश देणारा मार्ग आहे हे जाणूनच लेखक दीपक घायाळ यांनी हे पुस्तक बाजारात आणलं आहे. सोडवलेल्या प्रश्नांव्यतिरिक्त सरावासाठी भरपूर प्रश्न, सोप्या पद्धतीनं सोडवलेली अचूक उत्तरं, उत्तरापर्यंत येताना दिलेलं सविस्तर विश्लेषण, या बाबी विद्यार्थ्यांना फायदेशीर ठरणाऱ्या आहेत.