Summary of the Book
कालनिर्णयच्या यंदाच्या दिवाळी अंकात चित्रकलेला अधिक वाव देण्यात आला आहे. 'रेनसाँ'मधील प्रसिद्ध चित्रांच्या प्रतिकृती यामध्ये पाहायला मिळतात. कलासमीक्षक राजेंद पाटील यांनी हा विषय सौंदर्यशास्त्राच्या दृष्टीने विषद केला आहे. अचला जोशी यांनी एम. एफ. हुसेन यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे.
याबरोबरच राजन जयकर यांनी मुंबई न्यायसंस्थेवर, अरविंद गोखले यांनी देवबंद या मुस्लिम समाजातील गटाबाबत, शायना एन. सी. यांनी गुजरातसंबंधी लिखाण केले आहे. कथा, कविता, विनोद किश्श्यांचा खजानाही वाचकांसाठी आहे.