Hard Copy Price:
25% OFF R 250R 187
/ $
2.40
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
‘यसन’ म्हणजे बैलाच्या नाकात घातलेली दोरी. याचे नियंत्रण गाडीवानाकडे असते. अशा अनेक ‘यसनी’ माणसाच्या आयुष्यात प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष असतात. यामुळे त्याचे जीवन कचाट्यात सापडते, असे कथन करीत ज्ञानेश्वर प्रकाश जाधवर यांनी ‘यसन’ या कादंबरीतून ऊसतोडणी मजुरांचे ‘जीणं’ उभे केले आहे. ऊस काढणीच्या वेळेस फडातच कादंबरीच्या नायकाचा जन्म झाला. पहिल्या मुलीनंतर मुलगा जन्माला आल्याने वडील बाप्पाला खूप आनंद होतो. सगळे जीवन ऊसतोडणीत गेलेल्या आई-वडिलांना मुलगा वामनला (बबड्या) शाळेत घालण्याचे ठरवतात. मास्तरांची बोलणी खात शिक्षण सुरू होते अन् बबड्याचे मन त्यात रमते. घरी दैन्यावस्था असली, तरी आई व ‘माय’च्या प्रेमात आणि संस्कारात बबड्या मोठा होत असतो. सातवीनंतर माळेगावची बोर्डिंगची शाळा आधी आवडली नाही म्हणून पळून गेलेला वामन नंतर गुरुजींच्या संगतीमुळे शाळेतील चांगला मुलगा ठरतो. बारावीनंतर नोकरीचा शोध व अनुभव, पुढील शिक्षणानंतर रोजीरोटीचा प्रश्न, सुशिक्षित तरुणांच्या व्यथा, लग्नाचा प्रश्न या सर्व समस्यांना सामोते जाणाऱ्या नायकाचे जगणे यात रंगविले आहे.
खूप छान मनाला भिडणारी कादंबरी
आहे. तुम्हाला एक नवीन दृष्टीकोन आणि एक नवीन अँगल देऊन जाईल .
Mohan Bachche
10 Jul 2019 01 43 PM
अत्यन्त सुन्दर लिखाण आहे।
वाचताना मन भावनिक होउन जाते। Real Situation of TEACHER in Private Institute...
Must read
Sunil jadhawar
18 Jun 2019 09 24 AM
This novel is outstanding novel & writer has described about hero's life. How he faced problems in his life from childhood to married. Really the novel heartouch and when I was reading the novel I felt that this is related to me. So this novel is one of the best novel.
Ashish Jadhav
09 Jun 2019 06 55 AM
..."येसन"...कादम्बरी वाचायला घेतली आणि त्यातच हरवून गेलो..- प्रा. जाधवर यांनी खुप छान लेखन, शब्द रचना आणि नकळत डोळ्याच्या कड़ा ओल्या करुण टाकनारे कडू गोड़ प्रसंग..
काही क्षण मनाची घालमेल करणारे तर काही काळीज सुन्न करणारे..
जसे-मामा मामी चा भिंत पडून झालेला मृत्यु, बैल गाडी तून जाताना झालेला अपघात,सगळं चित्र डोळ्या समोर उभा राहते..
इतके भयानक प्रसंग आणि या परिस्थितीशी दोन हात करून -पाहिजे तो संघर्ष करून उभा राहिलेला मूळ नायक, आणि so call सुशक्षित आणि मालक शाही समाजा कडून त्याच्या मनाचे केलेले खच्ची करण आणी त्याच्यातील काबिलियत आणि शक्ती ला(बौध्दिक आणि वैचारिक) कशी "येसन" घातली जाते याचे ज्वलंत उदाहरण या कादंबरी मध्ये रेखाटले आहे...
या कादंबरी च्या माध्यमातून ऊसतोड कामगाराचे दुःख/कष्ट आणि एक स्वाभिमानी संघर्ष प्रा. ज्ञानेश्वर जाधवर यांनी अचूक शब्द मध्ये मांडला आणि त्याला वाचा फोडली आहे आणि माझ्या माहिती नुसार हे पहिले लेखक आहे की त्यांनी येसन च्या माध्यमातून हे चित्र समाजा पुढे आणले आहे ...👍👍
एकदा कादंबरी नक्की वाचावी हेच विचारी वाचकाला सांगणे आहे.
पुढील वाटचाली साठी शुभेच्या।।💐💐
श्री. आशिष जाधव
Shaji j
08 Jun 2019 10 43 PM
ग्रामिण भागात ऊस तोड काम करत आयुष्य जगणा-या कुंटूबाची कथा आहे. ज्यात कथेतला नायक वामन आहे. त्या वामनच्या जन्मापासून ते त्याच्या संपूर्ण आयुष्यात आव्हानं येतात. तो ते आव्हानं पेलवत मार्ग काढत पुढे जातो. वामन शिक्षण घेताना आलेल्या आडचणीवर मात करत नौकरीला लागतो. पण तिथेही त्याला संघर्ष करावा लागतो. त्यातून शिक्षण व्यवस्थेत कशी परवड होते आणि शेवटी तो उच्च शिक्षण घेवूनही चहाचा व्यवसाय करतो. एकंदरित यसन या कादंबरीत खूप प्रसंग आहेत, खूप सारे पात्र आहेत. वामन च्या जीवनात कोणीही आयडल नाही किंवा त्याचा देवावरही विश्वास नाही तो स्वतःचा मार्ग स्वतः शोधत आलाय त्यामुळे त्याची होणारी घुसमट होते. हे त्याच्या आत्मसंवादातून दिसून येत. सुरवातीचा काही भाग आणि प्रसंग (ऊसतोडणी आणि तत्कालीन परिस्थिती) हे भावनाविवश करतात...हृदयपिळवटून टाकतात...दारीद्र्याच कठोर वास्तव डोळ्यासमोर उभा करतात. शिक्षण व्यवस्था, त्याच बाजारीकरण आणि त्यातून होणारे शोषण यावर समर्पक चित्रण केलेलं आहे. पुस्तकाच्या नावाच्या समर्पक असा शेवट केला आहे.
Dipali kedar
08 Jun 2019 09 25 PM
Kupch bhavnik kartey hi kadambri.. mandani kup vyavsthi keliy... Dolyasmor chitr ubha rahat..