रामदास स्वामी यांचे मनाचे श्लोक अनेकांनी शालेय जीवनात पाठ केले असतील व्यावहारिक ज्ञानाचे धडे यातून मिळतात . श्रीदासबोध या ओवीबद्ध ग्रंथातून भक्तिज्ञान , शुद्धज्ञान , वैराग्य व मुक्तीचा मार्ग त्यांनी सांगितला ,असे नमूद करीत डॉ. सी.ग.देसाई यांनी 'सुबोध दासबोध' मधून या ग्रंथाची ओळख गद्यातून करून दिली आहे . गुरु व शिष्य यांच्यात झालेला संवाद असे दासबोधाचे स्वरूप आहे. याचे भाग म्हणजे दशक असून , प्रत्येक दशकात दहा समास म्हणजे पोटविभाग आहेत. या समासातील सात हजार ओव्यांच्या माध्यमातून समर्थांनी व्यवहार व परमार्थ यांचा परिचय करून दिला आहे . मूर्ख लक्षण , सगुण परीक्षा , नवविधा भक्ती , मंत्र , देवशोधन , चतुर्दश ब्रम्ह , ज्ञान , गुणरूप , जगज्ज्योती , भिमदशक , विविक वैराग्य , भीमदशक , नामरूप , अखंडध्यान , आत्मदशक , सप्ततिन्वय , प्रकृतिपुरुष , पूर्णदशक अशा विषयांवरील आपल्या मनातील प्रश्न आणि त्यांची उत्तरे याची चर्चा दासबोधात केली आहे ,असे लेखक सांगतात .
‘सुबोध दासबोध’ या पुस्तकाचा ‘बाइट्स ऑफ इंडिया’वरील परिचय वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा...
http://www.bytesofindia.com/Details/?NewsId=5729763791348786826