Hard Copy Price:
25% OFF R 150R 112
/ $
1.44
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
तुझा, “प्रतिबिंब, शब्द संग्रह आज संपूर्ण वाचून झाला. सर्व विषयांना स्पर्श केलेला आणि जगण्याचे गणित सोपे करून सांगणारा. मी अनेक कविता नेहमीच वाचतो परतू तू वापरलेली सहज, सुंदर भाषा, आणि त्यामधील गर्भित अर्थ आणि भावनेला तू घातलेला सहज असा हात हा फार मन मोहवून गेला. जगण्याची आशा तुझ्या डोळ्यात पहातो, अर्थ जीवनाचा मला उमगतो... किती सुंदर सहज भाषेचा वापर तू केलेला आहेस. प्रेमाचेही अगदी तसेच असते त्यावर लिहिलेल्या कविता तर अप्रतिमच आहेत. भावनिक आणि सामाजिक कविता तर बिनतोड आहेत. तू लिहिलेल्या प्रासंगिक कविता तर तुझ्यातील तरल मनाचे प्रतिबिंबच दर्शिवितात. तुझ्या भाषेत सांगायचे झाले तर तू म्हणजे प्रोडूक्टीव पर्संन्यालीती आहे असे आता मला वाटायला लागले आहे. तुझ्याकडून अशा सुंदर, भावनिक कविता तयार होवोत हीच भगवंताच्या चरणी प्रार्थना .. अतुल कुलकर्णी