Summary of the Book
देशाचा अनमोल ठेवा असलेल्या 'म हा भा र ता' तील अनेक व्यक्तिरेखा आजवर पुस्तकरुपातून
बंधिस्त झाल्या आहेत. मात्र, द्रोणाचार्य यांच्या व्याक्तीमत्वावर लिहिलेले हे पहिलेच पुस्तक असावे.
डॉ. भारती सुदामे यांनी परिश्रम पूर्वक केलेले हे संशोधन आहे.
भारद्वाजांच्या कलशामध्ये उत्पन्न झालेल्या द्रोणाच्या जन्मापासूनची कथा पुस्तकात येते.. त्यांचे बालपण, तपश्चर्या, कृपी हिच्याशी विवाह, पुत्र अश्वत्थामाचा जन्म, द्रोणाचार्य आणि द्रुपद राजा यांचे शत्रुत्व, द्रौपदी आणि दुष्टद्दूमनाचा जन्म असे अनेक कथानक उलगडत जाते..
द्रोणाचार्यांच्या जीवनात आलेल्या प्रमुख व्यक्ती कर्ण, एकलव्य, भीष्म, अर्जुन, यांची व्यक्तीचित्रेही समोर येतात. द्दूताचा प्रसंग, कौरव आणि पांडवांशी त्याचे असलेले नाते, रणांगणावर लढणारे द्रोण आणि अखेर अश्वत्थाम्याच्या मृत्यूची बातमी ऐकून शस्त्र खाली ठेऊन मृत्यू ला सामोरे जाणारे द्रोण पुस्तकात समोर येतात..