Hard Copy Price:
10% OFF R 300R 270
/ $
3.46
(Inclusive of all taxes) + FREE Shipping* Shipping charges will be applicable for this book. For International orders shipment charges at actual.
Buy Print Book
Add to Cart
Cash On Delivery
available in
Pune, Mumbai, Thane, Navi Mumbai
Check your delivery options:
Check
Standard delivery in 2-3 business days | Faster Delivery may be available
Summary of the Book
ज्या खेळाडूंना क्रीडाक्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करायची असेल, त्या सार्यांनाच हे पुस्तक अतिशय उपयुक्त आहे. कारण यात बहुमोलाचे ज्ञान आणि संकल्पना दिलेल्या आहेत. म्हणून श्री. बाम यांनी हे पुस्तक लिहिले, हे फारच उत्तम झाले असे मला वाटते…
राहुल द्रविड,क्रिकेटपटू
श्री. बाम यांच्यासारखाच पराकोटीचा साधेपणा, हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. क्रीडाक्षेत्रात सर्वोच्च कामगिरी करण्याची अपेक्षा बाळगणार्या सर्वच खेळाडूंनी आणि प्रशिक्षकांनी याचा अभ्यास करायला हवा म्हणजे क्षमता प्रगट करण्याच्या मार्गातले मानसिक अडथळे त्यांना दूर करता येतील. असामान्य प्रतिभेचा आविष्कार असलेले हे पुस्तक क्रीडाक्षेत्राशी संबंधित असलेल्या प्रत्येकाने वाचायलाच हहवे….
गीत सेठी, जागतिक अजिंक्यवीर बिलीयर्ड्स
हे पुस्तक वाचताना माझ्या क्रीडा जीवनाचा संपूण7 पट डोळ्यांसमोर उलगडला गेला. ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की, अनुभवाच्या कसोटीवर पारखलेले हे ज्ञान आणि तंत्रे आता क्रीडाक्षेत्र गाजवण्याची अपेक्षा धरणार्या सार्याच खेळाडूंना या पुस्तकाच्या रूपाने उपलब्ध आहे…
अंजली भागवत, जागतिक नेमबाजीत अव्वल क्रमांक
ज्याला आपला खेळ उत्तम व्हावा असे वाटत असेल, त्याने हे पुस्तक वाचायलाच हवे. सनातन अशा योगशास्त्रातल्या तंत्रांचा खजिनाच श्री. बाम यांनी या पुस्तकाच्या रूपाने प्रकाशात आणला आहे…
प्रकाश पडुकोण, जागतिक अजिंक्यवीर, बॅडमिंटन
कोणत्याही क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करायची असेल, तर हे पुस्तक वाचायलाच हवे. हृदयाला आणि मनाला शांती देणारे असेच हे पुस्तक आहे. यशस्वी होण्याचे रहस्य त्यात साध्या, सोप्या आणि सुस्पष्ट भाषेत उलगडले आहे.
कमलेश मेहता,आंतरराष्ट्रीय टेबलटेनिसपटू
हे पुस्तक खेळांडूसाठी म्हणून लिहिलेले असले तरी त्यातली तंत्रे कोणत्याही क्षेत्रातल्या समस्यांना आणि आव्हानांना समर्थपणे तोंड देण्यासाठी सक्षम बनवू शकतात. तेव्हा ते सर्वांनीच वाचावे आणि त्यातल्या तंत्राचा उपयोग करून पाहावा.
बाम सरांचे विजयाचे मानसशास्त्र हे मराठीतलेच काय तर संपूर्ण जगातले एक सर्वोत्तम "Self-help" पुस्तक आहे. बाम सरांनी प्रत्येक तंत्र्याचा इतक्या सखोल आणि सोप्या पद्धतीने विश्लेषण केले आहे, की ते कृतीत उतरवायला आपला उत्साह कयीक पटीने वाढतो.
भारतीय मानसशास्त्र (Indian Psychology) हे किती प्रौढ आणि ज्ञानसंपन्न आहे याचे हे पुस्तक एक प्रतिक आहे.
अनेक अलौकिक ऋषी, संत, योगी, आणि विविध संप्रदायांनी विकसित केलेले भारतीय मानसशास्त्र आपण सर्वांनी नक्की, या पुस्तकाच्या मदतीने, दररोजच्या जीवनात उतरवून त्याची नियमित साधना करायला हवी!
बाम सरांनी उत्तमाची आराधना, प्राणधारणा, मंत्रजप, प्रार्थना, स्वसंवाद, स्मृती परीशुद्धी, एकाग्रता, त्राटक, नि चित्रण या सर्व प्रभावी तंत्राचा जास्तीत जास्त उपयोग करून, आपण आपल्या निवडलेल्या क्षेत्रात उत्तमता कशी गाठायची आणि कर्तुत्व कसे गाजवायचे हे अगदी सहजरीत्या स्पष्ट केलेले आहे.