Summary of the Book
"ईशावास्य उपनिषद एक पूर्ण उपनिषद आहे. म्हणजे पारमार्थिक जीवनाचा एक परिपूर्ण आराखडा त्यात थोडक्यात मांडलेला आहे." गांधीजींच्या आज्ञेने, त्यांच्यासाठी लिहिलेल्या टिपणाची संशोधित आणि परीवर्धित आवृत्ती. ईशावास्य उपनिषदाच्या गेय गद्य भाषांतरासह.
" ईशावास्यएक लहानशी वस्तू आहे. परंतु त्याच्या चिंतनात माझ्या आयुष्याची कैक वर्षे गेली आहेत. ईशावास्य- वृत्तीत त्या चिंतनाचे सार कमीतकमी शब्दांत देण्याचा प्रयत्न आहे."- विनोबा